Friday, May 27, 2011

या हो या सावरकर जन्म घ्या पुन्हा

नमस्कार !! आज तारीख २८ मे, आज चिरंजीवी श्री विनायक दामोदर सावरकर , एक सच्चा माणूस, एक आजन्म स्वातंत्र्य सैनिक, एक साहित्यिक,एक वैचारिक तत्ववेत्ता आणि त्याहून थोर श्रद्धास्थान आणि एक अशी दैवी शक्ती ज्याच्या जवळ येण्यास मृत्यूलाही परवानगी घ्यावी लागली  यांची जयंती, त्या निमित्त त्यांना हि बोबडी शब्दवंदना.....................

या हो या सावरकर जन्म घ्या पुन्हा,
सागरही आतुरला तुमचे दर्शन घेण्या.

आजन्म मरेस्तोवर मातृभूमीवरती प्रेम,
करत राहिलात तुम्ही मोडला ना नेम.
तरी उपेक्षेत ओंजळ मरणानंतर आजही,
पुढे मिळेल ना मिळेल याचीही ना ग्वाही.

रक्तारक्तात स्वातंत्र्याचा तुमचा निछ्चय दाट,
तुम्ही एकटेच सागरात शोधणारे वाट.
बुद्धीने पंडित तरी गर्व राहिला दूर,
आपल्यांस मृदू पण शत्रूस तुम्ही अंगार.
त्या शिवाबपारी भासता तुम्ही एकटेच लढताना,
आणि एकट्यानेच सोसल्या साऱ्या  तुम्ही यातना.

घरदारावर तुळशीपत्र आणि देशास वाहिले प्राण,
देशचं होतं घर आणि स्वातंत्र्य हाच सन्मान.
मृत्यूही झुकला होता तुमच्या समोर जेव्हा,
हसत हसत संपवलीत तुम्ही जीवनसेवा.

मी भिकारी काय मांडणार शब्द तुमच्या जीवनाचा,
तुम्ही जगलात जसे त्यांना अर्थ होता वेदांचा,
आता नाही राहू देणार उपेक्षेच्या अंगणात,
देव आहे मोकळा अजुनी देशभक्तांच्या देवघरात.
निदान त्यांसाठी तरी जन्म पुन्हा घ्याना.
सागरही आतुरला तुमचे दर्शन घेण्या.


.....अमोल

No comments:

Post a Comment