Thursday, June 23, 2011

तिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा

(काही दिवसापूर्वी कल्याण मध्ये जी घटना घडली त्या निषेधार्थ)
.
.
.
तिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा,
काल काही जनावरांनी जीव घेतला त्या हरणाचा.
तिचा काय दोष होता जर का तिने उडू पाहिलं,
पण या वासनेच्या जंगलातलं वादळ तिला भोवलं.
कुणाच्या दोन क्षणाच्या माजेखातीर रंग उडाला तिच्या जीवनाचा.

का कठोर शिक्षा नाही या वासनेच्या भुकेलेल्यांना,
का वेसन नाही या मोकाट भडव्यांना.
समाजाला काय उपयोग या असल्या घाणीची,
तरी प्रशासन अजून शांत आहे कमालीची.
का असा कायदा नाही यांना जिवंत वधण्याचा.

आपण अजून वाट बघायची काआपली बहिण लुटण्याची,
जी काल रडत होती ती नव्हती कुणीच माझी तुमची.
कसा शांतपणे तरी गळ्याखाली उतरतो घास,
आणि कसे तरी शांत आपण बसतो ठेऊन हातावर हात,
जर का तिचे गुन्हेगार अजून फिरतायेत मोकाट.
तिला कधी मिळेल जोम नव्याने जीवन जगण्याचा.

आता काही तरी करायला हवंपेटून सर्वांनी उठायला हवं.
आपल्याही घरातली अब्रू असते बाहेर कामासाठी,
तिलाही मोकळं आकाश हवं.
त्यांना जरब हवी आहेक्षण  आला आहे धडा शिकविण्याचा
पण येवढं करून हि प्रश्न तोच कि,
तिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा.


..अमोल

Monday, June 20, 2011

आता चिडायचं नाही

आता चिडायचं नाही, ओरडायचं नाही.
आता फक्त हसायचं, रडायचं नाही.

आता कविता लिहायची स्वतःसाठीच,इतरांसाठी नाहीच मुळी
वाहवा स्वतःच द्यायची जरी वाटली कल्पना खुळी,
पण आवडणार नाही कुणाला म्हणून पान फाडायच नाही.

वाचता येईल तितक खोल उतरून वाचायचं मन समोरच्याच,
पण त्रयस्तपणे.
पान वाचताना आवडलं म्हणून दुमडायच नाही,
कि आवडलं नाही म्हणून वाचताच परतायचं नाही.
आणि कितीही असह्य झालं तरी स्वतःच पुस्तक इतरांसमोर उघडायच नाही.

चालताना वाटेमध्ये जुने जुने ओळखीचे भेटतील,
आठवणींचे ढिगारे खूपच खोल खणले तरी हरकत नाही,
पण एकाही खड्ड्यात आता बुडायचं नाही,
चालत राहायचं दूर दूर, नाही जमलं तर बसायचं वाटेतल्या दगडावरती,
पण किती वाटला दगड मोहक तरी आपला नाव त्यावर कोरायच नाही.

खोल खोल दऱ्या भेटतील मार उड्या,
उंच उंच डोंगरावरही चढायला घाबरू नकोस,
पण सावरायला नसेल कोणी म्हणून सांभाळून जा, पडायचं नाही,
आणि पडलास तरी हसायचं, रडायचं नाही.

आता झरलेले क्षण पुन्हा येतील पुढ्यात बसायला,
झालेल्या चुकांचे दोष शोधत राहायचं नाही,
येईल ते भोगायचं पण त्यांच्याशी भांडायचं नाही,
त्यातना शिकता येईल तेवढं शिकायचं, घडायचं, त्यांच्यावर बिघडायच नाही.
आता फक्त हसायचं, रडायचं नाही.

.....अमोल

Thursday, June 2, 2011

ऋतूबदल

हा कसा निसर्गात अचानक झाला बदल,
गाऊ लागला गीत वारा,बरसले आकाश होऊन जल.

कुठून गंध उठला मातीच्या कणाकणात,
रोमांच उठला शरीरी,हर्ष दाटला मनामनात.

या पूर्वी ना भासली सांज अशी अनोळखी,
पूर्वी कधी ना पहिली भिजणारी सांजसखी.

पान-पान ओले ओलेथेंब थेंब नवा नवा.
नवी जादू ओलाव्याची आणि किमया दावी गारवा.

भय उष्माचे इथवरले दूर कुठूनसे विरून गेले,
निसर्गाचे गारुड नवे ऋतू बदलाचे फिरून गेले.  

.......अमोल