Showing posts with label स्त्री विषयक. Show all posts
Showing posts with label स्त्री विषयक. Show all posts

Monday, April 1, 2013


ती बिनधास्त आहे,
तिच्या कर्तुत्वावर ती निर्धास्त आहे.
लढेल कोणत्याही संकटांशी,
इतकं तिच्यात धारिष्ट्य आहे.
ती बिनधास्त आहे.

तिचे विचार नवीन आहेत,
तिच्या कल्पनाही नवीन आहेत,
नवीन स्वप्न साकारण्याचे तिचे मार्गही नवीन आहेत.
तिच्या मनात भरारीचे निर्णय तरीही पक्के आहेत,
जरी पंखांवर पुरोगामित्वाचे अरिष्ट आहे.
ती बिनधास्त आहे.

तिच्या कडेही आहे एक स्त्रीमन,
ज्यात दडलंय एक हळवेपण,
जितक्या सहजपणे जाते office ला,
तितकी सहजपणे सांभाळते kitchen पण.
जितक्या तिच्या मैत्रिणी तितकेच मित्रही आहेत,
modern असली तरी सांभाळते
जाणीवेने आपुले स्त्रीधन.
मर्यादा ओलांडणार्यांसाठी,
तिच्यावरही चंडीकेचा वरदहस्त आहे.
ती बिनधास्त आहे.

ती थोडी नम्र आहे,
ती थोडी आगावू पोर आहे,
कधी अतिशय शालीन,
कधी दंगेखोर आहे.
घरही सांभाळते, स्वतःसाठीपण जगते,
जाणीवेने सार्या जगाकडे पाहते.
काळजातलं दुख कधी चेहऱ्यावर आणत नाही,
स्वताचा आनंद कधी एकटीचा मानत नाही.
चार गोष्टी सांगते कधी आईसारख्या समजावून,
कधी वागते अगदी वेड्यासारखी आपणहून.
अशी तशी कशी कशी पण जशी आहे तशी फार मस्त आहे.

..........अमोल 

Sunday, April 1, 2012

शाप मेहंदीचा.


ज्यांना  मुलं होत  नाही  अश्या स्त्रियांना  समाज  वांझ  म्हणतो,पण  असा  शिविवाचक  शब्द  पुरुषांसाठी  नाही  कारण  समाज  कधी  यासाठी  पुरुषाला  दोषी  धरतच नाही,आणि  शब्द दिला  असेल  तर तो निपुत्रिक  असा  सोज्वळ  शब्द  दिला  आहे.
आता  जी  कविता  सादर  करीत  आहे  ती  एक  पुरुष  म्हणून  करणे  काहींना  योग्य  वाटणार नाही, पण  जरा  भाऊ,  बाप , मुलीचा  मामामुलीचा  काका  या  दृष्टीकोनातुना  बघितले  तर पुरुषपण  गळून  जाईल, आणि  प्रश्न  उरेल  कि  खरच  "ती"  जवाबदार  असते  का  या  सगळ्याला.
शाप  मेहंदीचा
 कुण्या  हातावर  रंगते  मेहंदी,
कुण्या  हातावर  मेहंदी  रंगतच  नाही.
सारा  दोष  सारे  देती  मेहंदीलाच,
हाताला  कुणी  दोषी  धरतच  नाही.

धर्म  सदा  रंगण्याचा  असे  मेहंदीचा,
हातातल्या  उर्जेने  चढे  रंग  मेहंदीचा,
पानापानाला  कुटून  बने  लेप  मेहंदीचा,
चढे  ना  रंग  हा  काय  गुन्हा  केवळ  मेहंदीचा ?
सारा  भोग  सारा  त्रास  मेहंदीच्या  नशिबाला,
असे  किती  सोसले  मेहंदीने  हे  नसे  हिशोबाला.

काल  परवाही  कुण्या  हातांनी  झाड  तोडून  टाकले,
म्हणे  असेच  भोग  ना  रंगणाऱ्या  मेहंदीने  भोगायला  हवे,
ज्या  हातांमध्ये  कुवत  नसेल  मेहंदी  रंगवून  घेण्याची,
मग  सांगा  का  नको  ते  हातही  तोडायला  हवे ?
मेहंदी  निमूट  सोसते  म्हणून  भोगते  हा  भोग,
किती  वर्षे  झाली  नाही  बारा  हा  समाजातला  रोग.

_____________________________________________________________________

................अमोल

Wednesday, March 7, 2012

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


ती  आई  आहे,
ती ताई आहे,
ती मैत्रीण आहे,
ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे,
ती जन्म आहे, ती माया  आहे, तीच सुरुवात आहे, आणि  सुरुवात  नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे.












मी नव्या युगाची नारी, कुणा  घाबरणारी,
जे येईल मनात, ते आणि तेच करणारी.

एकविसाव्या शतकाची मी हि शिलेदार,
संकटांना झुकविण्यासाठी आता मी हि लढणार.
मी नाही केवळ कोमल कळी गंधित,
मी आही मर्दानी, खेळते खेळ रक्त रंजित.
मी जिजाऊ शिवबाची मार्ग दाखवणारी,
मी सावित्री युगाची अक्षर शिकविणारी,
मी राणी झाशीची हाती तलवार पेलणारी.

मी कधी होते मस्तानी शृंगार फुलविणारी,
कधी banded  queen अंगार खुलाविणारी.
मीच mother  teresa ममत्वासाठी  प्रिय,
मीच इंदिरा होते राजकारणी सक्रीय.
मीच किरण बेदी विजार घालून गुंड पकडणारी,
मीच अनाथांची माय सिंधुताई सपकाळ नव्वारी नेसणारी

मी सौंदर्यवती अप्सरा, गोड शब्दांचा झरा,
पुरुषास पुरुषत्व सिद्ध करण्या आधार माझा खरा.
मीच जन्म देते अन भागवते पहिली भूक,
कधी पत्नी, कधी आई बनून क्षमा करते प्रत्येक चूक.
ज्यास देते अस्तित्व त्याच्याशीच माझी लढाई,
त्याच्या नजरी केवळ मी फक्त एक बाई.
जरी modern  झाले तरी मी तीच राबणारी, गोड खाऊ घालणारी.

कानास सतत mobile , खांद्यावरी जड laptop .
मी हि वावरते पुरुषासारखी घालून जीन्स top .
मी विसरत नाही संस्कार कधी शालीनतेचा,
पण पुरुषी डोळा सदा वेध घेई चारित्र्याचा.
माझ्या madam पणा मागे एक लपलेली असते आई,
अभिमान आहे मला कि मातृत्व पुरुषाकडे नाही.
मी आज नाही परावलंबी, नाही आधारासाठी धडपडणारी

माझीही असते धावपळ ह्या corporate  क्षेत्रात.
मीही काळीज टाकून येते मागे, जीव जणू कात्रीत.
मी हि आहे पुरुषाच्या खांद्यास खांदा लावणारी,
कसले ना बंधन आता घेतली उंचच उंच भरारी.
मी नाही आता अबला केवळ रडणारी.

मीच सरस्वती ज्ञानाची देवी,
मीच अभंग जनाईची ओवी.
मीच किरण सूर्याचे, मी तळपणारा दीप,
मीच अक्षर, मीच शाही, लेखणीची निप.
गवसली मला शिक्षणाची तलवार,
आकाशाला सुद्धा मी झुकविणार अलवार.
मी तीच, वणवा पेटवणारी राखेखालची चिंगारी.

माँ तुजे सलाम!!!

................अमोल

Monday, February 6, 2012

सोय


















तू  फक्त  ओरबडलंस.................. एका  भुकेलेल्या  जनावराप्रमाणे,
मला   त्यात  विवेकी  माणूस  दिसलाच  नाही  कधी.
दिसला  तो  फक्त  वासनांध  राक्षसच.

माझ्या  मऊशार   कोमल   मेहंदीभरल्या  हात्तांना कुरवाळायाचं  सोडून कुस्करलस,
माझ्या नाजुकश्या  पाकळ्यागत   ओठांना तुझ्या दातांनी चिरडलस,
आणि  माझं  कौमार्य  तुझ्या  दांडगट पुरुषपणाखाली भरडलस.

ज्या  नाजूक  गाठी  प्रेमाने  सोडायच्या असतात त्या  तू तोडाव्या  तश्या तोडल्यास,
आणि  वर्षांचा  कुणी  भुकेला  जेवावा तसं खात सुटलास.
जे  पहिल्या  रात्री  तेच  प्रत्येक  रात्री.
मीही  मन  मारून  पडून  रहातेसमजूतदारपणा  जनावाराकडून कसला  करायचा.

तू  फक्त ओरबडलंस  तेव्हाही जेव्हा मी गर्भार  होते,
आणि  तेव्हाही  जेव्हा  किमान तेव्हा  तरी  जेव्हा  खरच  नको  होतं ओरबाडयला.

इतकं  करूनही  तू  समाजातला  एक  आदर्श नवराआदर्श  पुरुषआता  तर  आदर्श बापही होशील.
तुला  तुझा  व्यभिचार  या  आदर्शपणाच्या ओझ्याखाली मुक्तपणे जाऊन  बाजारात करता  येत नव्हता,
आणि  कुणावर  बलात्कार  करण्याची  तुझी ताकदच  नाही  तुझ्या  घाबरटपणामुळे,
म्हणून तू  "लग्न" ही  सोयीस्कर  वाट  निवडलीस.

................अमोल