Monday, October 24, 2011

कुणी केली किती माया तरी वाटतो परका


कुणी केली किती माया तरी वाटतो परका,
दुजेभाव मनातला सलतो सारखा.

मज वाटे कि प्रीत केवळ नसानसांतून धावे,
तसे नसे काही हे तर सारे फसवण्याचे कावे,
स्फटिक टोचती पाया फुटल्या हिरयांचे,
ते हिरे नव्हते होत्या नभातल्या तारका.

पुजत असतो ज्यांना मानून देव्हारयातली मूर्ती,
खरा भाव त्यांचा असतो  निजस्वार्थी,
चिखल होतो निष्ठेने वाहिल्या फुलांचा,
डोळ्यात झोंबतो भाळावरचा श्रद्धावंत भूक्का.

नफ्या-तोट्याचा सारा हा बाजार,
माया जमवण्याचा जडलेला आजार,
इथे बापच काढतो पोटच्या पोरीला विकाया,
तर कुण्या बापालाच आहे पोरापासून धोका.

वाटतो जो कुणी पुरया जीवनाचं आभाळ,
तोच करतो अखेर खरया  नात्यांची आबाळ,
धीर द्यायला आयुष्यभर असतो जो पाठीशी,
क्षणात सोडून साथ तो करतो पोरका.


जीव ओवाळून टाकतो खरा जयांवरी,
तोच खोल जखम देतो उरात अंतरी,
खंजीराची धार वार करताच नाही,
राग लपलेला असतो सुप्त मनातला मुका.

................अमोल

Tuesday, October 18, 2011

पहिल्यांदा काहीतरी बोलली माझी परी

आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी,
पहिल्यांदा  काहीतरी  बोलली  माझी  परी,
तिचे  बोबडे  बोल  मला  कळत  नव्हते  जरी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

तिच्या  मऊशार  हातांच्या  मऊशार बोटांनी,
कुरवाळत  माझ्या  गालांना  बोलली  ती  ओठांनी,
स्वर्गसुख्खच   जणू  प्राप्त  झालं मला  माझ्या  घरी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

ती  काय  बोलत  होती  तिलाच  काय  ते  ठाऊक,
तिच्या  बोलण्याच्या  सोहळ्यात  मी  मात्र  भाऊक,
नकळत  डोळ्यातून  बरसल्या  आनंदाच्या  सरी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.
हि  बोबड्या  बोलांनी  काय  काय  मागेल,
माझ्यातला  बाप जागा होऊन त्या  स्वप्नांमागे  लागेल,
गांभीर्य  आलंय वागण्यात  सोडून सारी  मस्करी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

उरलेलं  आयुष्य  आता  फक्त  याच  शब्दांसाठी,
आणि  हीच  तर  बनेल  माझ्या  आधाराची  काठी,
मी  हि  वेड्याने  सजवली  क्षणभरात  स्वप्न न्यारी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

तिच्या  पंखांसाठी  हवं  आकाश सुद्धा  मोठ्ठं,
पण  माझ्या  घरट्याचं  अंगण  फारंच  छोट्ट,
तिच्यासाठीच   खर्च  करीन  सुख्ख  माझी  सारी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

मोठी  होऊन जेव्हा  मिळवत  राहील  यश,
गर्वाने  सांगेल  "maza   baba   is   the   बेस्ट",
आयुष्याची सार्थकता  तेव्हाच  होईल  खरी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

........अमोल