तो मागतो निर्बुद्धाप्रमाणे बुद्धाकडे,
हातात तलवार घेऊन पंचाशिलाचे साकडे.
असत्य स्विकारतो बऱ्याचस्या छंदाने,
ते सत्य नको असते जे सांगितले विवेकानंदाने.
तोच तो त्यांचा म्होरक्या धर्म जाळणारा,
म्हणतो जन्मावा राम इथे धर्म पाळणारा.
रात्रीस कर्म काळी आणि भोगताना भोग,
गीतेत कृष्णास मागतो नीती आणि कर्मयोग.
शिवरायाच्या जन्माची चर्चा तरी केवढी,
त्यासम वागताना मात्र वळते किती बोबडी.
गांधीबाबा सच्चा, कोई ना उससे अच्छा |
टोपी पेहनकर उसकी सच बेचे उसीका बच्चा ||
हि कशी विषमता दिसते चहूकडे,
संतांनी पेरलेले संस्कारच पडले तोकडे,
राज्य सांभाळणारेच नाही मनात शुद्ध,
काय उपयोग तरी जन्मून परत, राम- कृष्ण-बुद्ध,
विवेकानंदानी परदेशातल्या स्त्रीसही मानली भगिनी,
आणि कितीतरी फुलं कुस्करली इथल्या नपुंसकानी.
स्वराज्यही बुडाले, लयास गेला हरएक टापू.
तेरे अहिंसापेही हिंसा हुवी माफ करना बापू.
....अमोल
No comments:
Post a Comment