लागली चाहूल नव वर्षाच्या आगमनाची,
जुने विसरून सारे धावणारी आशा मनाची.
रोज तेच जीवन, तीच नाती,
तीच नोकरी, तेच साथी.
पण तरी असतात मनी विश्वासाचे दोर हाथी,
याच विश्वासाने जगायची असते कंटाळवाणी घडी जीवनाची.
कधी थकवा जाणवतो, क्षीण येतो सार्यांचा,
आणि मनात जाळ उठतो मग जुन्या आठवणींचा,
ती केलेली मजा, एकत्र घालवलेले क्षण,
कधी हसत गेलेले, कधी फिस्कटलेले क्षण,
आणि हेच पुन्हा चेतना देतात नव काही जगण्याची.
जुनं वर्ष गेलं तसं पुढलही जाईलच.
आणि शांत आपण बसल्यावर एकदा तरी सर्वांची आठवण येईलच.
आता जरी आहोत आपण नव्या आयुष्याच्या वळणावरती,
तरी देवा कडे एकच विनंती न विसर पडू दे आम्हा एकमेकांचा कधी,
आस मनात ताजीच असावी एकमेकांना भेटण्याची.
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
अमोल
No comments:
Post a Comment