असा कधीही ऐकला नाही स्वर व्याकूळतिचा,
दिनकर माध्यानी असता किरण असा मावळतीचा.
भय अस्मानी लाटांचे पैलतीरावर होते,
बेभानपणाचे सूत्र माझ्या शिरावर होते,
वारयाशी अडले नाही शीड माझे कधीही.
वल्हवली नाव सदाच मार्ग विसरून परतीचा.
अडवती मज तेव्हा फास खूप मोहाचे,
हृदयस्पर्शी होते भास सभोवाचे,
मी न गुंतलो त्या स्वार्थी स्वप्नात केव्हाही.
आकाश गवसण्या तेव्हा गंध विसरलो मातीचा.
ती रात अंधारी आणि वादळ भयावह होते,
पण जिद्दीने जगण्याचे ते माझे वय होते,
लाटान्नाही चिरले त्या धाउनी आल्या जेव्हाही.
लढलो परी न रडलो केला सामना त्या रातीचा.
नव्हता रात्रीस तेव्हा दीपस्तंभ उजळणारा,
त्या पाण्यात होतो एकटाच मी जळणारा.
व्यथा तेव्हा माझी ना विचारली कोणीही.
एकू न दिला मीही कोणास स्वर माझा काकुळतीचा.
आपलेच होते आधी तोडण्यास आधार,
निंदेस जोर होता लाऊन जिभेस धार,
यशाने पैलतीरावर जाता तेच ओवाळती मज तेव्हाही,
परी जीव रडत होता वरीवरी त्या हसणाऱ्या वातींचाअमोल
No comments:
Post a Comment