मला येत नाही वृत्त आणि गण गझलेचे,
भावनेला आकार देते ती कैफियत मांडतो मी.
जीव जडतो जेव्हा एक एक शेर काळजात जातो,
ललनेसही लाजवेल अशी नजाकत मांडतो मी.
मी मांडतो असे तरी कशाला म्हणू उगाच मी,
वेदना सांगतील त्या शब्दांची वरात मांडतो मी.
कागद आणि शाहीची मला बंधने कसली,
उरातला भाव माझा थेट तुमच्या उरात मांडतो मी.
कल्पनेच्या कक्षा माझ्या गीतास नका लाऊ,
आजवर जे भोगले त्याची हकीकत मांडतो मी.
राहून गेले जगणे जिवंतपणाच्या शर्यतीत,
मृत्यूस दिल्या चकव्याची शरारत मांडतो मी.
फुलले काही फुलारे अपुऱ्या वसंतात,
काही न फुलल्या अंकुरांची दुखापत मांडतो मी.
जगण्याची वेगळी धुंदी गवसली आयुष्याला,
दुख्खात मिजास करण्याची हरकत मांडतो मी.
तुमचाही दर्द शांत होतो खोल काळजातल्या जखमेचा,
तुम्हास रिझवण्यासाठी वेदनांची खिरापत मांडतो मी.
.....अमोल
No comments:
Post a Comment