का लाजतेस साजणी नुसतेच हासतेस साजणी,
हे घर तुझे, मी हि तुझा, तू साऱ्याची स्वामिनी,
का बावरते अशी, कोणी ना परके तुला या क्षणी.
अग्नीब्राम्हण साक्षी ठेउनी, पूर्वजांचा मान राखुनी,
थोरांचा आशीर्वाद घेउनी हे जुळले नाते घे जाणुनी,
सुवर्णअक्षतांत न्हाउनी, वेद मंत्रांच्या पठनातुनी,
एकरूप झाली हि दोन शरीरे कुलदैवतेस स्थापुनी,
सनई चौघड्यांच्या तालास्वरात सुहासिनीनी ओवाळूनी ,
तू आलीस या घरात मंगल कलश ओलांडूनी,
तरी मग का लाजतेस साजणी नुसतेच हासतेस साजणी.
या अबोल ओठंना सांग बोलायला काहीतरी,
या शालीन नजरेला सांग निरखायला काहीतरी,
किती वेळ अंगठ्याने रेखाटशील नक्षी,
आता तरी उडू देत तो लाजेचा पक्षी,
न्याहाळ हे घर नवे ज्याचे मंदिर तुला करायचे,
आणि रंग भरायचे काढून रांगोळी अंगणी,
का लाजतेस साजणी नुसतेच हासतेस साजणी.
होते सुखाची छनछन,वाजता तुझा पैंजण.
नको मानुस याला बंधन, माझे आकाश दिले तुला आंदण.
हि गाठ असे पवित्र, जिचे नाव मंगळसूत्र.
हि माळ ना धाग्याची, हि माळ सौभाग्याची.
हा ना तुझा दागिना, असे माझ्या अस्तित्वाच्या खुणा.
हे ना नुसते मनी, हि सात जन्माची बांधणी.
का लाजतेस साजणी नुसतेच हासतेस साजणी.
तू कामना, स्वच्छ वासना, श्वासांतील रागिणी,
तू कामिनी, तू मोहिनी, तू शुद्ध वैरागिनी,
चित्ताचे रूप तू, आत्म्याचे स्वरूप तू, तू रुपाची यौवनी,
तूच अर्थ, तुच स्वार्थ, माझा सर्वार्थ हि तुझ्यातुनी,
तुझ्याच ओटीत मी अर्पितो हे घर प्रिय प्राणाहूनी,
मीच माझा न राहिलो सर्वस्व तुला अर्पुनी.
का लाजतेस साजणी नुसतेच हासतेस साजणी.
...अमोल
No comments:
Post a Comment