Wednesday, September 14, 2011

बाजार


आपल्या  देशात  दारू बंदी  होत नाही कारण  सरकारला  त्यातून revenue  मिळतो हे  जरी  मान्य  केले, तरी प्रश्न  हा पडतो कि  शरीविक्रय करायला  लावणाऱ्यांची  दुकानं  का  बंद  होत  नाहीत  त्यातून सरकारला  काय  मिळतं ? हे  तर  उघड  सत्य  आहे कि  यात  कितीतरी   पांढरपेशा  पांघरलेल्या  समाजातलीसुद्धा   लोकं  दलालीवर  पोट  भरत आहेपण  याच  पायी  भारताच्या  खूप खूप  गरीब गावांतून लहान मुली, तरुणी  आणल्या  जातातबाजार  असला कि  खरेदी  विक्री  होणारच. पण जर का  बाजारच  बंद  केला  तर निदान  ज्यांची  इच्छा  नाहीये  ( असं काम करायची मुळातच कुणाची इच्छा नसतेच) तर त्या   तरी  वाचतील. हे जरी आपल्याला  वाटत  असलं कि हि गंभीर  बाब  आहे तरी पण फार मोठ्या  प्रमाणात यात शासनाने लक्ष घालायला  हवे, पण ज्यांनी लक्ष घालायचे  त्यांना  भ्रष्टाचार,  scam  , घोटाळे, खुर्ची बचाव अश्या  कामांपासून वेळ  भेटेल तर हेही  होईल कि.


हात  पाय  बांधलेले  तोंडात  बोळा  कोंबलेला,
सुन्न थरार  रात्र  अनखोलीत  अंधार  तुंबलेला.

हा  काय  माझा  गुन्हा  का  रंग  माझा  वेगळा,
मोकळ्या  अंगास  माझ्या  वासनांध  स्पर्श  झोंबलेला.

जीव  देऊ  पहिला  पण  तोही कुठे  ताब्यात  होता?
वेदनेचा  अंत  बघण्या  काळ  हि  खोळंबलेला.

हात  पाय  सोडून  त्यांनी रस्त्यावरी फेकले,
ओळखींच्यापैकी  कुणी  नव्हता तिथे  थांबलेला.

बंद  दाराने  घराच्या  सांगितले  सर्व  काही,
सहानुभूतीचा  हात  परका  वाटला  आंबलेला.

नाही  राम  वा  कृष्ण  कोणी  लाज  माझी  राखणारा,
बेअब्रूचा  डाग  माझ्या  अब्रूवरी  लोंबलेला.

केव्हा  पासून  मन  मारून  जगते  आहे  कसेतरी,
आणि  जगेन  जोवरी  आहे  आत्मा शरीरी  डांबलेला.

......अमोल

2 comments:

  1. पाणी आले पापणीत...!
    भाकरी महाग येथे... म्हणुनी अब्रू स्वस्त आहे..
    शिलेदार वासानिकांची येथे सदैव गस्त आहे...???

    ReplyDelete