काल माझ्यासमोर रावण प्रकट झाला,
विचारत होता आता राम कुठे गेला.
सांगत होता " जरी मी सीतेला नेलं असेल उचलून,
पुन्हा हात नाही लावला मन तिचं डावलून.
पण दिवसाढवळ्या आज स्त्रीसंगे नको ते होतं,
आता बरं हे सारं त्या पुरुषोत्तम रामाला पहावतं.
आता का नाही उभी करत कायद्याची वानरसेना,
का नाही उभा चिरत तो या बलात्कारयानां.
त्याला म्हणावं जर का देणार नसशील यांना फाशी,
तर मग दे मला माझी लंका पूर्वी होती तशी.
रामायण काय फक्त धर्माच्या नावावर मिरवायला आहे,
म्हणावं ते कर्माकर्मात भिनवायला, गिरवायला आहे.
कसं काय तुम्ही बलात्कारयानां रावण म्हणू शकता,
मंदोदरी गर्वाने म्हणते यांपेक्षातर माझा रावणच बरा होता".
................अमोल
No comments:
Post a Comment