खाली मांडलेल्या भावना कदाचित कविता म्हणून पूर्ण नसतील पण कळकळ जी वाटली ती अशी कि, घरासाठी तितकेच राबून त्याची योग्य ती किंमत घरातल्या स्त्रीला मिळत नाही, तिला नेहमी दुय्यम स्थान दिले जाते. हि परिस्थिती मोल मजुरी करणाऱ्या स्त्रियांपासून corporate मध्ये काम करणार्यांपर्यंत( उदा. " हिच्या पगारात काय छोटे खर्च भागतात." ".................... हिचा कसला पगार, घरात कंटाळते म्हणून जाते आपली........") आहे,
समाजाने आता बदलायला हवे............ मी सुरुवात केली आहे..
सेवेत जन्म माझा रिता,
दुखात व्याकूळ मी सीता.
किती जन्म भोगायचा त्रास,
पुरे आता तरी हा वनवास,
रामाने पाळण्या आज्ञा पित्याची,
वाट धरली निमूट वनवासाची,
मी पाळण्या धर्म पतिव्रतेचा,
हात धरिला श्री रामाचा,
सोडून स्वप्ने माझी सारी,
गेली संगे ना फिरली माघारी,
आणि पुढे किती जन्म,
स्त्रीत्वास अशी लाचारी,
कधी मिळेल स्थान प्रथम,
कधी होईल स्वतंत्र नारी,
वनवास भोगून राम,
झाला पुन्हा राजा,
राजा विसरून धर्म पतीचा,
देई वनवास सीतेस दुजा,
तरी सांगे सीता बिचारी,
हा जन्म श्री रामाकरिता.
सेवेत जन्म माझा रिता,
दुखात व्याकूळ मी सीता.
जन्मताच मी ना पसंत,
करती आई बाप हि खंत,
ज्यास अर्पावे सारे जीवन,
त्यानेही द्यावे दुय्यम स्थान,
मी राबते फार घरासाठी,
त्याची कुणी करेचना गणती,
माझ्या मिळकतीस मूल्य शून्य,
माझ्या मेहनतीची किंमत नगण्य,
मला पंख काय कामाचे,
बंद दरवाजे आकाशाचे,
नाही करायचा मी त्रागा,
माझ्या आनंदास नाही जागा,
मी जगावे बनून सावली,
कुचंबना झेलावी वेळोवेळी,
तरी राखण्या घराची लाज,
मी भोगावे सारे सहज,
हवे तसे कुरवाळावे तुडवावे,
हा शाप जुना प्राजक्ता.
सेवेत जन्म माझा रिता,
दुखात व्याकूळ मी सीता.
............अमोल
No comments:
Post a Comment