चेहरे नव्हते जरी ओळखीचे पालखीचे,
समदुखाने बांधले नाते एका तळमळीचे.
दुख्खीतांच्या मेळ्यातला झालो वारकरी,
कधी वर्णिली दुखे कधी झालो टाळकरी.
दुख्खीतांच्या मेळ्यांत मी दुखाची ओवी गाईली,
काही दुखऱ्या पापण्यांत मी साक्षात
पंढरी पाहिली.
अदखलपत्र होते दुख्ख एकमेकांचे एकमेका,
तरी जात होत्या कनवाळू मुखातून हाका.
धीर द्यावा कुणी कुणास सारे होते
खचलेले,
ज्याच्या त्याच्या नशिबी दुख्ख भयाण
रचलेले.
ज्याचे त्याचे प्राक्तन सजे भिन्न
व्यथेच्या नक्षीने,
काही क्षणांस्तव झालो एक व्यथालयाच्या
साक्षीने.
दुख्ख संचित संपता तिथे राहण्यास अधिकार
नसतो,
वंदन माझे त्या तीर्थाला जिथे सुख्खाच
धिक्कार असतो.
निघण्याची वेळ झाली दूर झाली पाउले,
उंच कट्ट्यावरून पाहती दोन डोळे
किलकिले.
No comments:
Post a Comment