ती बिनधास्त आहे,
तिच्या कर्तुत्वावर ती
निर्धास्त आहे.
लढेल कोणत्याही संकटांशी,
इतकं तिच्यात धारिष्ट्य आहे.
ती बिनधास्त आहे.
तिचे विचार नवीन आहेत,
तिच्या कल्पनाही नवीन आहेत,
नवीन स्वप्न साकारण्याचे तिचे
मार्गही नवीन आहेत.
तिच्या मनात भरारीचे निर्णय
तरीही पक्के आहेत,
जरी पंखांवर पुरोगामित्वाचे
अरिष्ट आहे.
ती बिनधास्त आहे.
तिच्या कडेही आहे एक स्त्रीमन,
ज्यात दडलंय एक हळवेपण,
जितक्या सहजपणे जाते office ला,
तितकी सहजपणे सांभाळते kitchen पण.
जितक्या तिच्या मैत्रिणी तितकेच
मित्रही आहेत,
modern असली तरी सांभाळते,
जाणीवेने आपुले स्त्रीधन.
मर्यादा ओलांडणार्यांसाठी,
तिच्यावरही चंडीकेचा वरदहस्त
आहे.
ती बिनधास्त आहे.
ती थोडी नम्र आहे,
ती थोडी आगावू पोर आहे,
कधी अतिशय शालीन,
कधी दंगेखोर आहे.
घरही सांभाळते, स्वतःसाठीपण जगते,
जाणीवेने सार्या जगाकडे पाहते.
काळजातलं दुख कधी चेहऱ्यावर आणत
नाही,
स्वताचा आनंद कधी एकटीचा मानत
नाही.
चार गोष्टी सांगते कधी
आईसारख्या समजावून,
कधी वागते अगदी वेड्यासारखी आपणहून.
अशी तशी कशी कशी पण जशी आहे तशी
फार मस्त आहे.
..........अमोल
No comments:
Post a Comment