वारा असून
नसल्यासारखा होता का कुणास ठाऊक,
चेहरा हसून रुसल्यासारखा होता का कुणास
ठाऊक.
वारयावर झालाच नाही पावलांचा हळुवार
आवाज,
दिवसानेही अमावसेच्या रात्रीचा लाऊन घेतला रिवाज.
सांज रागावली होती कारण हुरहूर चोरली दुपारने,
सांज निमूट सुन्न कठीण मोकळ्या क्षणांस
सारणे,
आज गंध उतरलाच नाही दररोजपरी जमिनीवरी,
श्वास नुसताच चढला उतरला वाटलाच नाही
श्वासापरी.
कंटाळून तू झिडकारते नको असलेली गोस्ट एखादी,
कंटाळ्यालाही गम्मत यावी तू लडिवाळपणे झिडकारल्याची.
आज शब्द ऐकून कुणाचा हसवासच वाटलं नाही,
तू नसशील त्या ठिकाणी असावासच वाटलं
नाही.
अस्वथ नजर बिनधास्त होती सैरभर फिरताना,
भीतीच नव्हती तू बघण्याची चोरून तुला
बघतांना
सारं काही तेच,तिथेच, तसंच होतं जसं आधी,
जिवंतपणाचा अभाव सारा त्यांचा
श्वासही तुलाच शोधी.
तुझ्यातल्या ऊर्जेमुळे निर्जीवातही
चैतन्य धारण होतं,
आज सारं असून नसण्याला तुझी गैरहजेरी कारण होतं.
..........अमोल

This comment has been removed by the author.
ReplyDeletePrmat padlyavar asach honar
ReplyDeleteFor regular visitors, a clear layout and easy access can improve the overall experience. Winbuzz Login serves as a convenient starting point, while Cricket ID details are provided in a way that is natural and helpful. The website also keeps attention on deposits, withdrawals, and account guidance for betting and casino sections. With information arranged in a direct format, the platform helps users understand important details more easily and supports smoother day-to-day use.
ReplyDelete