कहा ले चली जिंदगी,
कहा चला उम्र का कारवा,
बिते दिनो मी डुबा जाये,
उडत्या मनाचा पारवा.
क्षण हळवे गतकाळातील,
काही सुखाचे काही दुखातील.
कुणी देई अंगी शिरशिरी,
कुणी सुखदसा गारवा.
किती चाललो संकटातूनी,
जरी पडलो तरी उठतो त्यातुनी.
सोडून आलो अपेक्षा ज्या,
तिथे जाई मनाचा पारवा.
कधी वाटेवर थांबलो नाही,
चला अकेला मार्ग पे राही.
उजेड ना दिशांत दाही,
केवळ अंधाराचा मारवा.
धन, दौलत नि संपत्ती,
उद्या अचानक सारे सरती,
जपली मी माणसे केवळ,
त्या आठवणी करती हिरवा.
उधळली सारी मनाची दौलत,
दुख वाटण्याची होती सवलत.
जीवापाड जपणारी माणसे,
माझ्यासारखी मिळोत सर्वा.
अशात एक होती सोबती,
चालली माझ्याच वाटेवरती.
इथवर दिला आधार मला,
कशाची न करता पर्वा.
वैभवात मी नांदलो जरी,
पाय राहिलेत जमीनीवरी.
विसरलो ना दिन कालचे,
वाढू न दिले कधीही गर्वा.
आज इथे हा दिन ढळताना,
आयुष्याचा शेवट कळताना.
आठवती ते सारे प्रियजन,
जो थे जिते वक्त मे गवाँ.
बिछड गये ओ दोस्त सारे,
जी रहे हे यादो के सहारे.
सकाळी जे पडले स्वप्न,
वाटले कि भेटलो काल वा परवा.
त्या जगण्याच्या उत्साहाला,
सलाम देते हि हवा,
कहाँ मे अकेला लढा,
साथ था मेरे अपना जहाँ.
.................अमोल
No comments:
Post a Comment