कधी सार्थ वाटे मनाचे इशारे,
कधी वाटते आहे व्यर्थ हे सारे.
इच्छा झुरावी,स्वप्ने चुरावी,
अशी दुखे कुणाच्या का वाट्यास यावी?.
फुलांनी फुलुनी दरवळावा गंध,
वेलीनी त्यांस अलवार हातात द्यावी.
जपावी ती सारी, द्यावा हळुवार स्पर्श,
पण नाजूक ती अंगे नये कुस्करावी.
आनंदाचा ऋतू घेउनी उमलती फुले सारी,
गांधाविना वाटती शून्य वारे.
कधी दाटतो मेघ डोळ्यातुनी,
कंप पावे सुरांची रेघ आतुनी आतुनी,
जीव आतुर होतो, आस वेडावते.
सहन होत नाही, सर आसवांची वहाते.
कळ उठता उरात, कसे मग हसावे?,
चिंता ना करावी,कसे निवांत बसावे?.
आसुसलेल्या आकांक्षा जाती विरघळूनी जेव्हा ,
नको वाटती तेव्हा जीवनाचे पसारे
कधी स्पर्श मोहाचा मोहरवूनी जातो,
आणि हर्ष प्रेमाचा मना हरवूनी गातो,
कधी टोचती काटे वाटेतील उगाच,
कधी बोचतो डंख मिठीतील वेगळाच.
बंद डोळ्यांना तेव्हा खरी जाग येते,
गाठ विश्वासाची जेव्हा सुटुनी पहाते.
जर का सावलीस श्राप असतो उन्हाचा,
कश्यास मग सजवू जीवन नश्वर असणारे. .....अमोल
No comments:
Post a Comment