(काही दिवसापूर्वी कल्याण मध्ये जी घटना घडली त्या निषेधार्थ)
.
.
.
तिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा,
काल काही जनावरांनी जीव घेतला त्या हरणाचा.
तिचा काय दोष होता जर का तिने उडू पाहिलं,
पण या वासनेच्या जंगलातलं वादळ तिला भोवलं.
कुणाच्या दोन क्षणाच्या माजेखातीर रंग उडाला तिच्या जीवनाचा.
का कठोर शिक्षा नाही या वासनेच्या भुकेलेल्यांना,
का वेसन नाही या मोकाट भडव्यांना.
समाजाला काय उपयोग या असल्या घाणीची,
तरी प्रशासन अजून शांत आहे कमालीची.
का असा कायदा नाही यांना जिवंत वधण्याचा.
आपण अजून वाट बघायची का, आपली बहिण लुटण्याची,
जी काल रडत होती ती नव्हती कुणीच माझी तुमची.
कसा शांतपणे तरी गळ्याखाली उतरतो घास,
आणि कसे तरी शांत आपण बसतो ठेऊन हातावर हात,
जर का तिचे गुन्हेगार अजून फिरतायेत मोकाट.
तिला कधी मिळेल जोम नव्याने जीवन जगण्याचा.
आता काही तरी करायला हवं, पेटून सर्वांनी उठायला हवं.
आपल्याही घरातली अब्रू असते बाहेर कामासाठी,
तिलाही मोकळं आकाश हवं.
त्यांना जरब हवी आहे, क्षण आला आहे धडा शिकविण्याचा.
पण येवढं करून हि प्रश्न तोच कि,
तिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा.
..अमोल
have no words to express my feelings ......... keep writing.
ReplyDelete