Monday, June 20, 2011

आता चिडायचं नाही

आता चिडायचं नाही, ओरडायचं नाही.
आता फक्त हसायचं, रडायचं नाही.

आता कविता लिहायची स्वतःसाठीच,इतरांसाठी नाहीच मुळी. 
वाहवा स्वतःच द्यायची जरी वाटली कल्पना खुळी,
पण आवडणार नाही कुणाला म्हणून पान फाडायच नाही.

वाचता येईल तितक खोल उतरून वाचायचं मन समोरच्याच,
पण त्रयस्तपणे.
पान वाचताना आवडलं म्हणून दुमडायच नाही,
कि आवडलं नाही म्हणून न वाचताच परतायचं नाही.
आणि कितीही असह्य झालं तरी स्वतःच पुस्तक इतरांसमोर उघडायच नाही.

चालताना वाटेमध्ये जुने जुने ओळखीचे भेटतील,
आठवणींचे ढिगारे खूपच खोल खणले तरी हरकत नाही,
पण एकाही खड्ड्यात आता बुडायचं नाही,
चालत राहायचं दूर दूर, नाही जमलं तर बसायचं वाटेतल्या दगडावरती,
पण किती वाटला दगड मोहक तरी आपला नाव त्यावर कोरायच नाही.

खोल खोल दऱ्या भेटतील मार उड्या,
उंच उंच डोंगरावरही चढायला घाबरू नकोस,
पण सावरायला नसेल कोणी म्हणून सांभाळून जा, पडायचं नाही,
आणि पडलास तरी हसायचं, रडायचं नाही.

आता झरलेले क्षण पुन्हा येतील पुढ्यात बसायला,
झालेल्या चुकांचे दोष शोधत राहायचं नाही,
येईल ते भोगायचं पण त्यांच्याशी भांडायचं नाही,
त्यातना शिकता येईल तेवढं शिकायचं, घडायचं, त्यांच्यावर बिघडायच नाही.
आता फक्त हसायचं, रडायचं नाही.

.....अमोल

Thursday, June 2, 2011

ऋतूबदल

हा कसा निसर्गात अचानक झाला बदल,
गाऊ लागला गीत वारा,बरसले आकाश होऊन जल.

कुठून गंध उठला मातीच्या कणाकणात,
रोमांच उठला शरीरी,हर्ष दाटला मनामनात.

या पूर्वी ना भासली सांज अशी अनोळखी,
पूर्वी कधी ना पहिली भिजणारी सांजसखी.

पान-पान ओले ओले, थेंब थेंब नवा नवा.
नवी जादू ओलाव्याची आणि किमया दावी गारवा.

भय उष्माचे इथवरले दूर कुठूनसे विरून गेले,
निसर्गाचे गारुड नवे ऋतू बदलाचे फिरून गेले.  

.......अमोल

Friday, May 27, 2011

या हो या सावरकर जन्म घ्या पुन्हा

नमस्कार !! आज तारीख २८ मे, आज चिरंजीवी श्री विनायक दामोदर सावरकर , एक सच्चा माणूस, एक आजन्म स्वातंत्र्य सैनिक, एक साहित्यिक,एक वैचारिक तत्ववेत्ता आणि त्याहून थोर श्रद्धास्थान आणि एक अशी दैवी शक्ती ज्याच्या जवळ येण्यास मृत्यूलाही परवानगी घ्यावी लागली  यांची जयंती, त्या निमित्त त्यांना हि बोबडी शब्दवंदना.....................

या हो या सावरकर जन्म घ्या पुन्हा,
सागरही आतुरला तुमचे दर्शन घेण्या.

आजन्म मरेस्तोवर मातृभूमीवरती प्रेम,
करत राहिलात तुम्ही मोडला ना नेम.
तरी उपेक्षेत ओंजळ मरणानंतर आजही,
पुढे मिळेल ना मिळेल याचीही ना ग्वाही.

रक्तारक्तात स्वातंत्र्याचा तुमचा निछ्चय दाट,
तुम्ही एकटेच सागरात शोधणारे वाट.
बुद्धीने पंडित तरी गर्व राहिला दूर,
आपल्यांस मृदू पण शत्रूस तुम्ही अंगार.
त्या शिवाबपारी भासता तुम्ही एकटेच लढताना,
आणि एकट्यानेच सोसल्या साऱ्या  तुम्ही यातना.

घरदारावर तुळशीपत्र आणि देशास वाहिले प्राण,
देशचं होतं घर आणि स्वातंत्र्य हाच सन्मान.
मृत्यूही झुकला होता तुमच्या समोर जेव्हा,
हसत हसत संपवलीत तुम्ही जीवनसेवा.

मी भिकारी काय मांडणार शब्द तुमच्या जीवनाचा,
तुम्ही जगलात जसे त्यांना अर्थ होता वेदांचा,
आता नाही राहू देणार उपेक्षेच्या अंगणात,
देव आहे मोकळा अजुनी देशभक्तांच्या देवघरात.
निदान त्यांसाठी तरी जन्म पुन्हा घ्याना.
सागरही आतुरला तुमचे दर्शन घेण्या.


.....अमोल

Thursday, May 19, 2011

smile please ........... ok !! "click "

तो तसा धीट होता, नेहमीच असायचा.
seriousness  वागण्यात होताच,पण मात्र गोड हसायचा.
नेमकं त्या दिवशी मी त्याला रडताना पाहिलं,
पण आलेलं पाणीही फार काळ डोळ्यात नाही राहिलं.
ती वेळ तशी चांगलीच होती, त्याच्या बाळाच्या नामकरण विधीची,
पण नक्कीच त्यावेळी त्याला, गोष्ट आठवली असेल काही आधीची.

झालं हेच होतं कि, एक वर्षापूर्वी त्याचे वडील वारले होते,
काही महिन्यापूर्वीच तर त्याने स्वतःला त्यातून सावरले होते,
वडील असताना जवाबदार्याचं ओझं त्याच्यावर नव्हतं,
पण त्यानंतर मात्र त्याने स्वतःला parties , pickniks मधून आवरले होते.
काहीच तर माहित नव्हतं त्याला, सगळ्या जवाबदारया नव्या होत्या,
कोणीच नव्हतं त्याचवेळी सांगायला त्या गोष्टी, ज्या नेमक्या सांगायला हव्या होत्या.
आई तर त्याच दुखात दिनरात दिसायची,
ते tension कमी होतं कि काय म्हणून लग्नाच्या वयातली बहिण समोर असायची.

पण एके दिवशी अचानक आनंदाचा पाऊस पडला,
सुखावले सारे घरचे आणि तोही जो होता दुखाने पिडला.
ज्या गोष्टीसाठी अपार डॉक्टर्स, मेहनत एवढाच काय नवस केले होते,
सारं काही फळाला आलेलं, त्याच्या बायकोला दिवस गेले होते.
वडील वारल्याच दुख तर होतच मनात तसंच,
पण नव्या आनंदाने बदलून गेलं सारंच.
काळाच्या नियमाप्रमाणे दुखाचा होऊ लागला विसर,
तिला दिवस गेल्यानेच होता हा सारा असर.

हळू हळू काळ ओसरला नवा बाळ जन्मा आला,
तो सर्वांना सांगत होता मला मुलगा झाला.
हळूच कोणी त्याला म्हणाला तुझाच बाबा पुन्हा जन्मला.
बारश्याच्या दिवशी गाऱ्हाणे घालताना देवाला,
मनाचा हळवा कोपरा पुन्हा हेलावला.
तो नकळत बोलून गेला "बाबा तुम्ही हवे होते",
झोपलेल्या बाळाने तेव्हाच नेमके "ट्या ट्या" केले होते.
कोणीतरी म्हणालं  ऐकून सारं हे,
अरे बघ पुन्हा बाबाच आला आहे.
डोळ्यात आलेला थेंबही त्याने लगेच पुसला,
मी मात्र तो क्षण नेमका तेव्हाच टिपला.

smile please ........... ok !!  "click "


.....अमोल