Friday, July 22, 2011

तुझा हात हवा होता सदा माझ्या उश्यावर

  image by

तुझा हात हवा होता सदा माझ्या उश्यावर,
थापटून मला झोपवायलाअचानक जाग आल्यावर
मी अजून सुद्धा दचकून जागा होतो मधीच,
तुझी काळजी रात्रभर सतावत राहते उगीच.
तू का इतक्या लवकर सोडून गेलीस गाव माझं,
'आईविना पोर' असं घेतात लोक नाव माझं.
वरवरच्या पदार्थाची मला चवंच लागत नाही,
काय करू, तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.
पोरकेपणाचा माझ्याभोवती का ठेऊन गेलीस जाळ,
का खरंच इतकी कच्ची होती तुझ्या माझ्यातली नाळ.





















तिथं कुणी आहे का तुझ्याशी बोलायला भरपूर,
उगाच रडत राहू नकोस दाबून स्वतःचा ऊर.
बघं आता आई मी रडत नाही पडलो तरी,
मला ठाऊक आहे तू गेली आहेस देवा घरी.
भूक लागली तरी बिलकुल मी रडत नाही,
कारण मी हसल्याशिवाय तुला चैन पडत नाही.
पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो,
अंथरुणात लपून, पुसून डोळे मी गप्प झोपी जातो.
बघं तुझं बाळ किती समजूतदार झालं आहे,
आणि वय कळण्याआधी वेडं वयात आलं आहे.
अजिबात म्हणजे अजिबात त्रास देत नाही पप्पाला,
तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग देवबाप्पाला.
आणि सांग कि हे शहाणं बाळही आहे जरा हट्टी,
जर का काही झालं तुला तर घेईन म्हणावं कट्टी.
मी आता थकलोय तुला ढगांमध्ये पाहून,
ये आता भेटायला नजर तिथली चुकावून.
जमलं जर का सुट्टी घ्यायला तर ये निघून अशीच,
पोट भरतं गं रोज पण मायेची भूक अजून तशीच.

......अमोल


Monday, July 18, 2011

छोटीशी ओंजळ आहे हो आमची.....

नको आम्हाला liberalization , privatization , globalization  ..................
छोटीशी ओंजळ आहे हो आमची.....
ज्यात सुखाने जगण्याची नाहीतर नाही पण सुखाने मरण्याची तरी खात्री द्या.

अहो rocket  science , sapce  science ने कुणाचं भलं करताय.
रेल्व्येच्या गर्दीत जीव जातोयसांगा त्याचं कधी बघताय.
अहो मंगळचंद्र या निर्जीव जीवरहित ग्रहांवर शोधताय तरी काय,
आमच्या धास्तावलेल्या आयुष्यावर काढा काही तरी उपाय.

metro  रेल्वेच्या नावावर आम्हालाच taxes  चा दंड,
आणि पहिल्या पावसात साध्या लोकलचेही signals  बंद.
नको हायफाय सुविधा, निदान साध्यातरी द्या,
छोट्याश्या ओंजळीत जीवन जगण्याची निदान खात्री द्या.

तुम्ही करा diplomacy ते करतायेत bomb  हल्ले,
तुम्ही ठोका भाषणे, इथे सामन्यांचे जीव चाल्ले.
वरून या डिवचायला स्पिरीट स्पिरीट म्हणून,
आम्ही आपलं जगायचं जीवाचा विट मानून.
आणि कसलं स्पिरीट कसलं काय,
अहो पोटासाठीच धावतायेत पाय.

मेल्यानंतर कश्यासाठी जगताना मदत जाहीर करा,
तुमच्या security  ला नाही police त्यांना लढायला माहीर करा.
महागाई, भ्रष्टाचार हे आता habitual  झालंय,
पण हे bomb वैगरे याची सवय नाहीये  आम्हाला,
नाही काही मोठी आशा पण संद्याकाळी पोहचू घरी जिवंत,
निदान याची तरी खात्री द्या.
छोटीशी ओंजळ आहे हो आमची.....
ज्यात सुखाने जगण्याची नाहीतर नाही पण सुखाने मरण्याची तरी खात्री द्या.

.....अमोल

Saturday, July 2, 2011

तुझं तुलाच सावरायला हवं

फार मौल्यवान आहे तुझ्या अब्रूची ठेव,
म्हणून म्हणतो तुझं तुलाच सावरायला हवं.

आता किती वाट बघशील कि कोणीतरी येईल,
तूच कर काहीतरी नाहीतर उशीर होईल.
बेछूट जनावरांनी भरलंय हे सारं गावं.

तुझ्या शिलाच रक्षण तुलाच आता करायचंय,
या वासनेच्या जंगलात तुलाच आता तरायचंय.
तुलाच आत्मसाद करायचंय लढण्यासाठी बळ नवं.

तुला आता कळायला हवा स्पर्शाचा अर्थ,
आणि कळायला हवं मन नजरेतून पुरतं.
तू फसायचं नाही जरी किती टाकले त्यांनी डाव.

धन्य होती द्रौपदी जिला लाभला श्रीक्रिष्ण,
पण प्रत्येकाचं नशीब असतं भिन्न भिन्न.
आताच्या युगात प्रत्येकवेळी कसा धावेल देव.

डोळे उघडून चालआंधळ्यासारखे वागू नकोस,
खरचटलंलागलं तरी आधार उगी मागू नकोस.
सहानुभूतीच्या मुखवट्याखाली करतील वेगळाच बनाव.

सहवास आणि प्रेम यातलं अंतर जाणून घे,
आयुष्याचा मार्ग वारंवार तपासून घे.
काळजीपूर्वक वागण्याचा लावून घे सराव.

स्वाभिमान काय असतो हा खरा जाणून घे,
करारीपणाचे लक्षण स्वतः अंगी बाणून घे.
तुझ्या शरीराकडे नजर लावून बसलंय कुणी भडवं

तुझ्या वागण्याकडे आहेत बरेच चष्मे वर,
त्या आंबट जिभेला लागतंच कुणाचं तरी लक्तरं.
त्यांना किती जवळ करायचं हे सुद्धा तूच ठरव.

बेधुंद वागावं वाटेलही पण जरा आवर घाल,
उंच उडणाऱ्या पाखरासाठीच त्यांनी पसरवलेत जाळ.
म्हणून खऱ्या विश्वासाचा सर्वप्रथम घे तू ठाव.

आपण राहतो तो समाज सर्व घटकांचा बनलेला असतो,
नीतीवानांसोबत अनियातीचा राक्षसही इथेच वसतो.
स्वताही काही बंध पाळण्याचा पक्का कर ठराव.

तू स्वयंभू आहेस स्वतःचं  जीवन जगण्यासाठी,
शिक्षणाचा आधार घे अन्यायाशी लढण्यासाठी.
ओळख स्वतःला पुरतं, करू नकोस तोंड रडवं.

तूच ठरवून घे तुझ्या पटावरले सोबती,
उगाच नको वाढवू अनोळखी नाती.
स्वरक्षणाची शिस्त स्वतःच स्वतःला लाव.


......अमोल

Thursday, June 23, 2011

तिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा

(काही दिवसापूर्वी कल्याण मध्ये जी घटना घडली त्या निषेधार्थ)
.
.
.
तिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा,
काल काही जनावरांनी जीव घेतला त्या हरणाचा.
तिचा काय दोष होता जर का तिने उडू पाहिलं,
पण या वासनेच्या जंगलातलं वादळ तिला भोवलं.
कुणाच्या दोन क्षणाच्या माजेखातीर रंग उडाला तिच्या जीवनाचा.

का कठोर शिक्षा नाही या वासनेच्या भुकेलेल्यांना,
का वेसन नाही या मोकाट भडव्यांना.
समाजाला काय उपयोग या असल्या घाणीची,
तरी प्रशासन अजून शांत आहे कमालीची.
का असा कायदा नाही यांना जिवंत वधण्याचा.

आपण अजून वाट बघायची काआपली बहिण लुटण्याची,
जी काल रडत होती ती नव्हती कुणीच माझी तुमची.
कसा शांतपणे तरी गळ्याखाली उतरतो घास,
आणि कसे तरी शांत आपण बसतो ठेऊन हातावर हात,
जर का तिचे गुन्हेगार अजून फिरतायेत मोकाट.
तिला कधी मिळेल जोम नव्याने जीवन जगण्याचा.

आता काही तरी करायला हवंपेटून सर्वांनी उठायला हवं.
आपल्याही घरातली अब्रू असते बाहेर कामासाठी,
तिलाही मोकळं आकाश हवं.
त्यांना जरब हवी आहेक्षण  आला आहे धडा शिकविण्याचा
पण येवढं करून हि प्रश्न तोच कि,
तिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा.


..अमोल